केजरीवाल यांची तिहार तुरुंगात रवानगी; १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश

केजरीवाल यांच्याशी संबंधित दोन प्रकरणांवर सोमवारी राऊज एव्हेन्यू कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. कोर्टात ‘ईडी’ने सांगितले की, केजरीवाल हे चौकशीत सहकार्य करत नाहीत. ते प्रश्नांची गोलमाल उत्तरे देत आहेत. केजरीवाल यांनी या प्रकरणाची माहिती लपवली आहे.
केजरीवाल यांची तिहार तुरुंगात रवानगी; १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आता त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. ते तुरुंग क्रमांक दोनमध्ये एकटे राहणार आहेत.

केजरीवाल यांच्याशी संबंधित दोन प्रकरणांवर सोमवारी राऊज एव्हेन्यू कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. कोर्टात ‘ईडी’ने सांगितले की, केजरीवाल हे चौकशीत सहकार्य करत नाहीत. ते प्रश्नांची गोलमाल उत्तरे देत आहेत. केजरीवाल यांनी या प्रकरणाची माहिती लपवली आहे.

विजय नायर, एन. डी. गुप्तांबाबत जबाब संशयास्पद

राऊज एव्हेन्यू कोर्टात ‘ईडी’ने दावा केला की, केजरीवाल यांनी चौकशीत सांगितले की, अतिशी व सौरभ भारद्वाज यांना ‘आप’चा माजी प्रसार व प्रचार प्रमुख विजय नायर रिपोर्ट करत होता. तसेच एन. डी. गुप्ता यांच्याबाबत विचारल्यानंतर केजरीवाल यांनी कथितपणे परस्परविरोधी जबाब नोंदवले. केजरीवाल यांनी सर्वात पहिल्यांदा एन. डी. गुप्ता यांना पक्षाच्या कामाबाबत माहिती ठेवणारा व्यक्ती म्हणून जवळ केले. मात्र, कथित घोटाळ्याबाबत त्यांच्या भूमिकेबाबत एका वक्तव्यानंतर ते मागे हटले.

तुरुंगात केली पुस्तक, विशेष वस्तूंची मागणी

केजरीवाल यांच्या वकिलांनी तुरुंगात त्यांना काही औषधे, रामायण, महाभारत, ‘हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाईड बाय’ आदी पुस्तके मागितली आहेत. तसेच त्यांना विशेष भोजन देण्याची विनंती केली. तसेच लॉकेट, टेबल व खुर्ची मागितली.

दरम्यान, भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी ‘आप’वर टीका करताना सांगितले की, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांनी भ्रष्टाचार प्रकरणात सापडल्यानंतर व तुरुंगात गेल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, केजरीवाल यांनी अजूनही पदाचा राजीनामा दिलेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in