उत्तर प्रदेशात दलित महिलेवर बलात्कार करून तिची भीषण हत्या

तीन आरोपी फरार, अखिलेश यादव यांनी सरकारला धरले धारेवर
उत्तर प्रदेशात दलित महिलेवर बलात्कार करून तिची भीषण हत्या

बांदा : एका चाळीस वर्षांच्या दलित महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करून तिच्या देहाचे तुकडे करण्याची भीषण घटना मंगळवारी बांदामधील एका गावात झाली. या प्रकरणी संबंधित आरोपी फरार असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गिरवान क्षेत्रातील हे गाव आहे. येथील पोलीस अधिकारी संदीप तिवारी यांनी ही माहिती दिली.

मंगळवारी सदर महिला राजकुमार शुक्ला यांच्या पीठ गिरणीमध्ये साफसफाईसाठी गेली होती. जेव्हा तिची २० वर्षांची मुलगी तेथे पोहोचली तेव्हा तिने एका खोलीतून आपल्या आईच्या किंकाळ्या ऐकल्या. ती तेथे गेली मात्र तो दरवाजा आतून बंद होता. काही वेळाने ती तेथे गेल्यानंतर जेव्हा दरवाजा उघडला होता, तेव्हा आईचा देह तेथे तीन तुकड्यांमध्ये पडला होता. तिने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी राजकुमार शुक्ला, त्याचा भाऊ बऊवा शुक्ला आणि रामकृष्ण शुक्ला या तिघांविरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगितले. मात्र हे सर्व आरोपी फरार आहेत.

या घटनेवरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. बांदा जिल्ह्यातील ही घटना अत्यंत घृणास्पद आणि हृदयद्रावक आहे. उत्तर प्रदेशातील महिलांमध्ये यामुळे भयाचे वातावरण असून तीव्र संतापही व्यक्त होत आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या आयआयटीच्या विद्यार्थिनीचे कपडे उतरविण्याची घटनाही घडली आहे. असे सांगत या पार्श्वभूमीवर यादव यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

उत्तर प्रदेशातील महिलांनी भाजप सरकारवरील विश्वास पूर्ण गमावला असून आता या सरकारकडून अपेक्षा करण्यात अर्थ नाही, असेही त्यांनी एक्सवर व्यक्त केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in