कुत्र्याने तोडला वकिलाचा लचका; सुप्रीम कोर्टात भटक्या कुत्र्यांवर सखोल विचारमंथन

सर्वोच्च न्यायालयात ही चर्चा सुरू आहे
कुत्र्याने तोडला वकिलाचा लचका; सुप्रीम कोर्टात भटक्या कुत्र्यांवर सखोल विचारमंथन

नवी दिल्ली : एका वकिलाला कुत्रा चावला. तो त्याच अवस्थेत सुप्रीम कोर्टात पोहचला. सरन्यायाधीशांनी त्याची अवस्था पाहून त्याच्याशी चर्चा केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरन्यायाधीशांसह अन्य वकिलांनी भटक्या कुत्र्यांबाबत सखोल विचारमंथन केले.

चंद्रचूड यांना समजले की, कुत्रा चावल्याने ही जखम त्या वकिलाला झाली आहे. यावरून एक प्रदीर्घ चर्चाच सर्वोच्च न्यायालयात झाली. कारण या चौकशीमुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येची चर्चा ही सर्वोच्च न्यायालयात पोहचली.

चंद्रचूड यांनी एका वकिलाच्या हाताला झालेली जखम पाहिली. तुला हे कसं लागलं हे विचारलं. त्यानंतर चर्चा सुरू झाली. चंद्रचूड यांनी याविषयी चिंता व्यक्त केली आणि तातडीने वकिलाच्या प्रकृतीविषयी चिंता केली आणि त्याला मदत करण्याची शिफारस केली आणि म्हणाले की, तुला काही वैद्यकीय मदत हवी आहे का? मी इथल्या लोकांना सांगून मी तुला दवाखान्यात घेऊन जाऊ शकतो.

या चर्चेदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उत्तर प्रदेशात घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला. एका लहान मुलाला कुत्रा चावला होता. या मुलावर उपचार करण्यात आले, पण ते योग्य प्रकारे झाले नाहीत. त्यानंतर या मुलाला रेबीज झाला, असे मेहता यांनी सांगितलं.

त्यानंतर या मुलाला रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याचा जीव वाचवण्यासाठी काहीही करता आले नाही. यानंतर चंद्रचूड यांनीही त्यांचा एक अनुभव सांगितला. दोन वर्षांपूर्वी माझे क्लार्क कार पार्क करत होते. त्यावेळी रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. सर्वोच्च न्यायालयात ही चर्चा सुरू झाल्यानंतर वरिष्ठ वकील विजय हंसारिया यांनी सरन्यायाधीशांना रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याच्या ज्या घटना आहेत त्याची दखल घ्या, अशी विनंती केली. तसंच लोकांच्या सुरक्षेबाबत काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत याचे निर्देश दिले जावेत, अशी विनंतीही केली आहे. या विनंतीनंतर चंद्रचूड म्हणाले की, या प्रकरणाचा विचार नक्की केला जाईल. काय उपाययोजना करता येतील ते आपण पाहू, असं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिस केवी विश्वनाथन आणि जे. के. महेश्वरी यांच्या खंडपीठाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत ज्या याचिका येत आहेत त्यासंबंधीही विचार केला जाईल, असे म्हटले होते. या याचिकांमध्ये केरळ आणि बॉम्बे हायकोर्टाद्वारे अशाच प्रकरणात देण्यात आलेल्या आदेशांचा विचार होईल, असे स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in