एअर इंडिगोच्या विमानात मद्यधुंद प्रवाशाने केला एअर होस्टेसचा विनयभंग

विमान मुंबई विमानतळावर उतरताच एरिक वेस्टबर्गला सीआयएसएफने ताब्यात घेतले. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले
एअर इंडिगोच्या विमानात मद्यधुंद प्रवाशाने केला एअर होस्टेसचा विनयभंग

बँकॉकहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडिगोच्या विमानात मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एरिक हॅराल्ड जोनास वेस्टबर्ग (६३) असे या व्यक्तीचे नाव असून तो स्वीडनचा नागरिक आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. दरम्यान, याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

एनडीटीव्हीने टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एअर इंडिगोच्या बँकॉकहून मुंबईला जाणाऱ्या विमानात एअर होस्टेस प्रवाशांना जेवण देत असताना ही घटना घडली. यावेळी एरिक वेस्टबर्गने २४ वर्षीय एअर होस्टेसचा हात पकडून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. एअर होस्टेसने हात झटकून स्वतःची सुटका केली. मात्र, त्याने पुन्हा तिचा हात धरला आणि तिला आपल्याकडे ओढले. अखेर इतर प्रवाशांनी हस्तक्षेप करून एरिक वेस्टबर्गला समजवण्याचा प्रयत्न केला.

एअर होस्टेसने वैमानिकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर विमान मुंबई विमानतळावर उतरताच एरिक वेस्टबर्गला सीआयएसएफने ताब्यात घेतले. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in