शंभू सीमेवर विषप्राशन करून शेतकऱ्याने केली आत्महत्या

आपल्या विविध मागण्या धसास लावण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शंभू सीमेवर शेतकरी निदर्शने करीत आहेत.
शंभू सीमेवर विषप्राशन करून शेतकऱ्याने केली आत्महत्या
Published on

पतियाळा : आपल्या विविध मागण्या धसास लावण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शंभू सीमेवर शेतकरी निदर्शने करीत आहेत. त्यापैकी एका शेतकऱ्याने गुरुवारी विषप्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. निदर्शनाच्या ठिकाणी तीन आठवड्यांत घडलेली ही दुसरी घटना असल्याचे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले.

विषप्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव रेशमसिंग (५५) असे असून तो तरण तारण जिल्ह्यातील पहुविंद येथील रहिवासी आहे. रेशमसिंग याला तातडीने पतियाळातील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे तो मरण पावला. केंद्र सरकार शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवत नसल्याने रेशमसिंग निराश झाला होता, असे शेतकऱ्यांचे नेते तेजवीरसिंग यांनी सांगितले. यापूर्वी १८ डिसेंबर रोजी रणजोधसिंग या शेतकऱ्याने शंभू सीमेवर आत्महत्या केली होती.

गेले वर्षभर शेतकऱ्यांचे आंदोलन

संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली पंजाब आणि हरयाणा शंभू सीमेवर १३ फेब्रुवारीपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पिकांच्या किमान हमीभावाला हमी द्यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in