कर्नाटकात सहा जणांच्या टोळीचा आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला

बुरखा घातलेल्या महिलेला दुसऱ्या समाजातील पुरुषासोबत पाहून त्याने लगेचच अल्पसंख्यांक समाजातील स्थानिक मुलांच्या टोळीला त्याची माहिती दिली.
कर्नाटकात सहा जणांच्या टोळीचा आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला

हवेरी : कर्नाटकमधील हवेरी जिल्ह्यातील हंगल तालुक्यात एका आंतरधर्मीय जोडप्यावर सहा जणांच्या टोळीने हॉटेलच्या खोलीत घुसून हल्ला केला. सोमवारी ८ जानेवारीला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

अल्पसंख्याक समाजातील २६ वर्षांच्या या विवाहित महिलेने कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळात ड्रायव्हर म्हणून नोकरी करणाऱ्या ४० वर्षांच्या पुरुषाशी तिचे तीन वर्षांपासून संबंध होते. ते दोघे या हॉटेलमध्ये उतरले होते. या प्रकरणी हल्लेखोरांमधील दोघांना अटक करण्यात आली आहे. हॉटेलच्या खोलीत झालेला संपूर्ण हल्ला टोळीने चित्रीत केला होता. हे व्हिडीओ नंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाल्यानंतर व्हायरल झाले, असे पोलिसांनी सांगितले. यात व्हिडीओमध्ये, सहा पुरुष एका खोलीचा दरवाजा ठोठावताना दिसत आहेत. जेव्हा एक पुरुष दरवाजा उघडतो तेव्हा हल्लेखोर आत घुसून महिलेच्या दिशेने जाताना दिसतात. या टोळीने या जोडप्याला शाब्दिक शिवीगाळ केली, मारहाण केली आणि महिलेने बुरख्याने चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचे चित्रीकरण केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा हे जोडपे हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्यांना एका रिक्षाचालकाने पाहिले. बुरखा घातलेल्या महिलेला दुसऱ्या समाजातील पुरुषासोबत पाहून त्याने लगेचच अल्पसंख्यांक समाजातील स्थानिक मुलांच्या टोळीला त्याची माहिती दिली. त्यानंतर १५ मिनिटांमध्ये २३ ते २६ वयोगटातील सहा जणांची टोळी हॉटेलमध्ये आली आणि त्यांनी या जोडप्याचा शोध सुरू केला. त्यांनी हॉटेलच्या खोलीत घुसून दाम्पत्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यांना पाहताच महिलेने आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यांना मारहाण केली आणि हॉटेलमध्ये त्यांच्या उपस्थितीबद्दल शंका घेतली. त्यांनी अखेरीस त्यांना खोलीबाहेर ओढले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तीन मोटारसायकलवरून आलेल्या टोळीने या दाम्पत्याला हॉटेलपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी दाम्पत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी महिलेला शिवीगाळ करून लाठ्याकाठ्यांनी मारल्या, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर या टोळक्याने तिला ५०० रुपये देऊन मूळगावी जाण्यास सांगितले. ती नंतर पती राहत असलेल्या सिरसी येथे गेली. तिला सात वर्षांची मुलगी आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

टोळीने त्या ठिकाणाहून पळ काढला आहे.पोलिसांना घटनेच्या एका दिवसानंतरच या प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी गंभीर दखल घेत या जोडप्याचा शोध घेतला. पीडितेच्या तक्रारीवरून बुधवारी गुन्हा दाखल करून हल्ल्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in