समग्र दृष्टीकोन व लोकसहभागातून पर्यटन क्षेत्रात क्रांती घडेल- जी किशन रेड्डी

राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतातील विविध राज्यांमधील मान्यवरांच्या सत्काराने झाली
समग्र दृष्टीकोन व लोकसहभागातून पर्यटन क्षेत्रात क्रांती घडेल- जी किशन रेड्डी

समग्र दृष्टीकोन व लोकसहभागातून देशातील पर्यटन क्षेत्रात क्रांती घडू शकेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी व्यक्त केले.

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतातील विविध राज्यांमधील मान्यवरांच्या सत्काराने झाली. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, हरियाणा, मिझोराम, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, आणि हिमाचल प्रदेश या १२ राज्यांचे पर्यटन मंत्री यावेळी उपस्थित होते.

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांची तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद कालपासून सुरू झाली.

कोविड महामारीला मागे सारत पर्यटन उद्योग आता पुनरुज्जीवनासाठी सज्ज झाला आहे,असे जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. पर्यटनाच्या दृष्टीने भारत एक समृद्ध देश असून भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांना इथल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांची आणि अनुभवांची पर्वणीच मिळते. समृद्ध वारसा आणि जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या भारतात सण, धर्म,परंपरा आणि चालीरीतींचा सर्वांगीण संगम पाहायला मिळतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in