दहशतवादी संघटनांची यादी तयार करणार

समरकंद येथे आठ देशांच्या बैठकीच्या अंतिम दिवशी या परिषदेच्यावतीने एक संयुक्त जाहीरनामा जारी करण्यात आला.
दहशतवादी संघटनांची यादी तयार करणार

दहशतवादी गटांकडून सुरक्षेला निर्माण झालेला धोका लक्षात घेता त्याचा सामना करण्यासाठी ‘शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एससीओ) सदस्य देशांनी दहशतवादी, फुटीरतावादी संघटनांची एकत्रित यादी तयार करण्याची योजना आखली आहे.

समरकंद येथे आठ देशांच्या बैठकीच्या अंतिम दिवशी या परिषदेच्यावतीने एक संयुक्त जाहीरनामा जारी करण्यात आला. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी दहशतवादाच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली. दहशतवाद, फुटीरतावादाविरोधात लढण्यासाठी कटिबद्धता या परिषदेत सर्व सदस्य राष्ट्रांकडून व्यक्त करण्यात आली. दहशतवादाचा प्रसार रोखणे, दहशतवाद्यांचा वित्त पुरवठा खंडित करणे, दहशतवाद्यांची भरती रोखणे, सीमेकडून घुसखोरीला पायबंद घालणे, दहशतवादी विचारधारा प्रसारित करणे बंद करणे, स्लीपर सेल व दहशतवाद्यांचे आश्रय असलेल्या जागा उद‌्ध्वस्त करणे आदींबाबत या बैठकीत एकमत झाले. आपापल्या देशांमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी, फुटीरतावादी संघटनांची एकत्रित यादी करण्यावर सर्व देशांमध्ये सहमती झाली आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले की, शांघाय सहकार्य परिषदेतील प्रत्येक सदस्य देशाला दहशतवादाच्या आव्हानाची जाणीव आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in