लांब पल्ल्याचा प्रवास होणार सुखकर ; 'वंदे भारत स्लिपर' लवकरच प्रवाशांच्या सेवेत

पुढच्या वर्षीच्या मार्च महिन्यात वंदे भारत स्लिपर तयार होऊन कारखान्याच्या बाहेर पडणार आहे
लांब पल्ल्याचा प्रवास होणार सुखकर ; 'वंदे भारत स्लिपर' लवकरच प्रवाशांच्या सेवेत
Published on

कमी वेळेत जास्त प्रवास, तो ही आरामदायक, यासाठी वंदे भारत एक्सप्रेस ओळखली जाते. आता आपण लांब पल्ल्याचा प्रवास अगदी निवांत झोपून पुर्ण करु शकणार आहात. कारण वंदे भारत स्लिपर लवकरच प्रवाशांच्या दिमतीला हजर होत आहे. ती एक्सप्रेस आधुनिक सोयी- सुविधांनी असणार आहे. त्यामुळे प्रवासाचा शीण येणार नाही.

रेल्वे मंत्रायलयाने लांब पल्ल्यासाठी वंदे भारत स्लिपर ट्रेन सुरु करण्यासाठी कवाय सुरु केली आहे. मात्र, यावर्षी ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येणार नाही. ही ट्रेन पुढच्या वर्षी प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. चेन्नईच्या द इंडिग्रल कोट फॅक्टरीत वंदे भारत स्लिपरच्या डिझाईनच काम सुरु आहे. या वर्षीच्या डिसेंबर अखेरपर्यंत त्याला मूर्त रुप मिळणार आहे. पुढच्या वर्षीच्या मार्च महिन्यात वंदे भारत स्लिपर तयार होऊन कारखान्याच्या बाहेर पडणार आहे. त्यानंतर लगेच किंवा महिन्याभरात प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची शक्यता आहे.

मागील महिन्यात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनच्या तीन प्रकाराबद्दल माहिती दिली होती. त्यासुनार, वंदे चेअर कार, वंदे मेट्रो आणि वंदे स्लीपर्स पुढील वर्षात फेब्रुवारी किंवा एप्रिल महिन्यात प्रवाशांच्या सेवत उपलब्ध असतील असं सांगण्यात आलं होतं. यापैकी १०० किमीपेक्षा कमी अंतरासाठी वंदे मेट्रो, १००-५५० किलोमीटरसाठी वंदे चेअर कार आणि ५५० पेक्षा जास्त किलोमीटरसाठी स्लिपर ट्रेन असणार आहे.

प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा

या स्लिपर कोचमध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. यात वाय-फाय, एलडी स्क्रीन प्रवाशांना माहिती देत राहील. सुरक्षा, ऑटोमॅटिक फायर सेंसर, GPS सिस्टम, तसंच आरामदायक बेड असणार आहेत. ही ट्रेन अत्यंन एकोफ्रेंडली असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in