भर रस्त्यावर नमाझ पढणाऱ्या इसमास अटक

समाज माध्यमावर त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
भर रस्त्यावर नमाझ पढणाऱ्या इसमास अटक

पालनपूर : गुजरातच्या बनास्कनाथा जिल्ह्यात एका ट्रक ड्रायव्हरला भर रस्त्यात नमाझ पढून अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुजरात पोलिसांनी रविवारी अटक केली. या इसमाचे नाव बचल खान असून तो ३७ वर्षांचा आहे. समाज माध्यमावर त्याच्या या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. शहरात वर्दळीच्या ठिकाणी ट्रक बाजुला थांबवून रस्त्यातच नमाझ पढतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यावर अडथळा व धोका निर्माण केल्याप्रकरणी आयपीसी कलम २८३, १८८ व १८६ अन्वये बचल खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in