Video | पेट्रोलपंप कर्मचाऱ्याचे रशियन पर्यटक महिलेसोबत लाजीरवाणे कृत्य, पोलिसांनी शिकवला धडा

विदेशी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ तिच्यासोबत असलेल्या मित्राने कॅमेऱ्यात कैद केला असून तो व्हायरल झाला आहे.
Video | पेट्रोलपंप कर्मचाऱ्याचे रशियन पर्यटक महिलेसोबत लाजीरवाणे कृत्य, पोलिसांनी शिकवला धडा

राजस्थानमधील जयपूरमध्ये एका रशियन पर्यटक महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जयपुरमधील एका स्थानिक पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने महिलेला वारंवार स्पर्श केला. यावेळी रशियन पर्यटक ही तिच्या ट्रॅव्हल व्लॉगर असलेल्या मित्रासोबत होती. व्हिक्टोरिया असे या महिलेचे नाव आहे. विदेशी महिलेसोबत असलेल्या तिच्या मित्राने याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला धडा शिकवला.

रशियन पर्यटक व्हिक्टोरिया ही दिल्लीस्थित भारतीय मित्रासोबत दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी जयपूर येथील एका स्थानिक पेट्रोल पंपवार पोहचली. यावेळी कर्मचाऱ्याने वारंवार व्हिक्टोरियाच्या पायाला स्पर्श केला. यानंतर तिच्या सोबत असलेल्या मित्राने कर्मचाऱ्याला जाब विचारल्यांतर त्याने तिची माफी मागितली. मात्र, त्या तरुणाने पेट्रोलपंपच्या मॅनेजरकडे याबाबत तक्रार केली. यानंतर पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याला कान पकडून माफी मागण्यास सांगितले.

विदेशी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ तिच्यासोबत असलेल्या मित्राने कॅमेऱ्यात कैद केला असून तो व्हायरल झाला आहे. हा प्रकार आपल्यासोबत घडला यानंतर इतरांसोबत देखील घडू शकतो, असेही तिचा मित्र बोलताना दिसतो. व्हिडिओत कर्मचारी माफीही मागताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in