मुखदर्शनाचा ‘तो’ फोटो खोटा असल्याचा खुलासा

अयोध्येतील राम मंदिरात स्थानापन्न केलेल्या रामलल्लाच्या चेहऱ्याचा फोटो शुक्रवारी व्हायरल झाला होता. हा फोटो राम मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्तीचा नसून व्हायरल झालेल्या फोटोची चौकशी केली जाणार.
मुखदर्शनाचा ‘तो’ फोटो खोटा असल्याचा खुलासा

लखनऊ : अयोध्येतील राम मंदिरात स्थानापन्न केलेल्या रामलल्लाच्या चेहऱ्याचा फोटो शुक्रवारी व्हायरल झाला. मात्र, हा फोटो राम मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्तीचा नसून व्हायरल झालेल्या फोटोची चौकशी करू, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी स्पष्ट केले आहे. सत्येंद्र दास यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्याशिवाय मूर्तीचे डोळे उघडले जात नाहीत. ते झाकलेलेच असतात. जेव्हा हा सोहळा होईल, तेव्हाच रामलल्लाच्या मूर्तीचे डोळे दिसतील. सध्या ज्या मूर्तीचा फोटो व्हायरल होत आहे, ती खरी मूर्ती नाही. रामलल्लाची पूर्ण मूर्ती सध्या झाकून ठेवलेली आहे. धर्मातील कर्मकांडाप्रमाणे विधिवत श्रृंगार पार पडेल, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in