देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज

देशात सध्या रब्बी गहू पेरणीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. गहू हे देशातील रब्बी म्हणजे हिवाळी हंगामात घेतले जाणारे प्रमुख पीक आहे
देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज

नवी दिल्ली : यंदा संपूर्ण देशभरात पावसाने दगा दिला असला तरी त्याचा गव्हाच्या पिकावर फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. कारण केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीक वर्ष २०२३-२४ हंगामासाठी देशभरात एकूण ११.४० कोटी टन गहू उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

देशात सध्या रब्बी गहू पेरणीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. गहू हे देशातील रब्बी म्हणजे हिवाळी हंगामात घेतले जाणारे प्रमुख पीक आहे. गेल्या आठवडा अखेरपर्यंत देशभरात ३२०.५४ लाख हेक्टर क्षेत्रावर गहू पेरा पूर्ण झाला आहे. २०२२-२३ जुलै ते जून पीक हंगामात दशेभरात विक्रमी ११.०५ कोटी टन गव्हू उत्पादन घेण्यात आले होते. त्याआधीच्या पीक वर्षात देशात १०.७७ कोटी टन गहू उत्पादन झाले होते. राष्ट्रीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अशोक मीना यांनी सर्व काही ठीक झाले तर देशात यंदा ११.४ कोटी टन गहू पीक येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्रात देखील वाढ झाली आहे. काही राज्यात एक टक्का घट झाली असली तरी ती जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरुन निघेल असे मीन यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा गव्हाच्या हमीभावान ७ टक्के वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी आपला माल सरकारलाच विकतील असा विश्वास देखील मीना यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी अन्न महामंडळाने २.६२ कोटी टन गव्हू खरेदी केला होता. तसेच बफर स्टॉकसाठी १.८४ कोटी टन गव्हाची खरेदी केली होती. यंदा एप्रिलपासून गव्हाची कापणी सुरु होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in