सीप्झ सेसच्या कामांचा गोयल यांच्याकडून आढावा

सीप्झ सेसच्या कामांचा गोयल यांच्याकडून आढावा

अमृत महोत्सवी वर्षातील सोहळ्याचा एक भाग असलेला हा प्रकल्प १ मे २०२३पासून कार्यरत करण्याची योजना आहे.

उच्च दर्जाची यंत्रांचा वापर आणि मेगा सीएफसी सुविधेची झळाळी वाढेल असे नामकरण करण्याची आवश्यकता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी मुंबईतील अंधेरी येथील सीप्झ-सेझला भेट दिली आणि सुवर्ण महोत्सवी वर्षात सुरू केलेल्या विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. सिप्झ-सेझचे रूप बदलून टाकणारा व्हर्जन २.०० रिबुटेड अशा नावाने सुरू असलेला २०० कोटी रुपयांचा रुपांतरण प्रकल्प सिप्झ-सेझ मध्ये राबवण्यात येत आहे. त्याची आढावा बैठक ही मुख्यत्वे सिप्झ- सेझ मधील संबंधितांसाठी तसेच इथे कार्यरत असलेल्या युनिट साठी तयार मेगा कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यावर मुख्यत्वे केंद्रित आहे. अमृत महोत्सवी वर्षातील सोहळ्याचा एक भाग असलेला हा प्रकल्प १ मे २०२३पासून कार्यरत करण्याची योजना आहे.

मेगा सीएफसीचे नामकरण हे त्याच्या झळाळीत भर टाकणारे असावे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी सुचवले त्याचप्रमाणे तेथे उच्च दर्जाची यंत्रसामग्री आणण्याची गरज असण्यावर भर दिला. त्याचप्रमाणे जीजेईपीसी शिष्टमंडळाला कोणत्याही आघाडीवर तडजोड न करण्याचा सल्ला दिला.

या भेटीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रांना, सिप्झ-सेसचे विकास आयुक्त श्याम जगन्नाथन तसेच संयुक्त विकास सचिव (जेडीसी), सी पी एस चव्हाण यांनी केंद्रीय मंत्र्यांना प्रकल्पाच्या सध्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली

वाणिज्य आणि उद्योगमंत्र्यांना सुरू असलेल्या कामाची, काही परवाने, होणारा विलंब आणि प्रकल्पाशी संबंधित इतर कामे यांची माहिती त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in