बैठी जीवनशैली आरोग्यासाठी धोकादायक

अकाली मृत्यूचे प्रमाणही १३ टक्क्यांनी वाढू शकते, असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे
बैठी जीवनशैली आरोग्यासाठी धोकादायक

दरदिवशी थोडा तरी व्यायाम करा, असा सल्ला तज्ज्ञ मंडळी आणि डॉक्टरांकडून दिला जातो. बैठी जीवनशैली आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते, हे एका संशोधनावरून आता समोर आले आहे. २१ देशांतील एक लाख नागरिकांवर अलीकडेच करण्यात आलेल्या संशोधनात बैठे काम किती धोकादायक ठरू शकते, हे स्पष्ट झाले. दिवसभरात ६ ते ८ तास बसून राहिल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो तसेच अकाली मृत्यूचे प्रमाणही १३ टक्क्यांनी वाढू शकते, असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

जगभरातील बऱ्याचशा देशांमध्ये नोकरीच्या निमित्ताने किंवा घरात असतानाही एकाच स्थितीत बसून काम करण्याकडे अनेकांचा कल असतो. कोरोना काळात तर हे प्रमाण आणखीनच वाढले आहे. त्यामुळेच भारत, बांगलादेश, झिम्बाब्वेसारख्या देशांमध्ये अकाली मृत्यू, हृदयविकाराचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेक जण या बैठ्या कामाचे किंवा जीवनशैलीचे बळी ठरू लागले आहेत. संशोधनानुसार, धूम्रपानासारख्या सवयीमुळे होणारे मृत्यू हे बैठ्या जीवनशैलीच्या तुलनेत अधिक आहेत. विकसित देशांत दिवसभरात सहा ते आठ तास बैठे काम करतात. त्यामुळे त्यांची जोखीम १० टक्क्यांनी वाढते. विकसनशील देशांत ही जोखीम २५ टक्क्यापर्यंत वाढू शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in