छत्तीसगडमधील चकमकीत सहा महिन्याच्या मुलीचा मृत्यू

सोमवारी छत्तीसगड पोलिसांच्या डीआरजी जवानांना विजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली.
छत्तीसगडमधील चकमकीत सहा महिन्याच्या मुलीचा मृत्यू

विजापूर: छत्तीसगडच्या विजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली, या चकमकीत एका सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत मुलीच्या आईलाही हाताला गोळी लागली. याशिवाय दोन डीआरजी जवानही चकमकीत गोळ्या लागल्याने जखमी झाले आहेत.

सोमवारी छत्तीसगड पोलिसांच्या डीआरजी जवानांना विजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली. माहिती मिळताच डीआरजी जवानांचा एक गट शोध मोहिमेसाठी निघाला. शोध मोहिमेदरम्यान डीआरजी सैनिक आणि नक्षलवादी समोरासमोर आले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. गोळीबारात या परिसरात राहणाऱ्या सहा महिन्यांच्या मुलीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला, तर तिच्या आईलाही हाताला गोळी लागली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in