विमान कंपन्यांसाठी सहा सूत्री योजना

धुक्यामुळे कमी दृश्यमानता असल्यावरही टेक ऑफ करणे विमानांना सोयीचे बनेल. तसेच धावपट्टी १०/२८- सीएटी ३ ही तातडीने सुरू केली
विमान कंपन्यांसाठी सहा सूत्री योजना

नवी दिल्ली : धुक्यामुळे विमानांना उशीर होत असल्याने प्रवाशांचा संताप ठिकठिकाणच्या विमानतळांवर वाढला आहे. वैमानिकांना मारहाण होत असून प्रवासी थेट धावपट्टीवर बसून जेवण घेत असल्याचे उघड झाल्याने सरकारला खडबडून जाग आली आहे. धुक्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सहा सूत्री कार्यप्रणालीची घोषणा केली. तसेच विमानतळांवर ‘वॉर रूम’ उभारण्याच्या सूचना सर्व विमानतळांना दिल्या आहेत. सध्या धुक्यामुळे शेकडो विमान उड्डाणांना उशीर होत असून काही उड्डाणे रद्द केली जात आहेत. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, प्रवाशांचा त्रास कमी करायला विमान कंपन्यांसाठी कार्यप्रणाली तयार केली आहे. दिल्ली विमानतळावरील धावपट्टी २९ एलला सीएटी ३ कार्यान्वित केले. त्यामुळे

धुक्यामुळे कमी दृश्यमानता असल्यावरही टेक ऑफ करणे विमानांना सोयीचे बनेल. तसेच धावपट्टी १०/२८- सीएटी ३ ही तातडीने सुरू केली जाईल. धुक्यामुळे विमाने उशिरा धावत असल्याने प्रवाशांमध्ये संताप आहे. अनेक तास प्रवाशांना विमानात बसावे लागत आहे. देशाच्या उत्तर-पूर्वेत्तर भागात गेल्या १५ दिवसांत दाट धुक्यामुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सोमवारी दिल्ली विमानतळावर पाच उड्डाणांचे मार्ग बदलले, तर १०० हून अधिक विमाने विलंबाने उडाली. मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर भोजन करत असल्याचा व्हिडीओ उघड झाल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण खात्याने व ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिएशन सिक्युरिटीने इंडिगो व मुंबई विमानतळाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in