
ग्रेटर नोएडातून बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरी झाली आहे. शास्त्री यांच्या दर्शनासाठी आलेली गर्दी अनियंत्रित झाली आणि अनेक लोक बेशुद्ध पडले. यामुळे अनेकांना गंभीर दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे.
काल देखील शास्त्री यांच्या कथा वाचनावेळी सुरक्षा रक्षकांनी काही भक्तांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या लोकांवर सुरक्षेची जबाबदारी होती. त्यांनीच भक्तांसोबत बाचाबाची झाल्यावर त्यांच्या एकामगोमाग कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला होता. काही लोकांनी मध्यस्थी करत भक्तांना यातून सोडवलं होतं. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर तुफान व्हारल झाला होता.
यातचं आज बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात खुप गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची श्रीमद भगवद गीता कथा सुरु आहे. बुधवारी दिव्य दरबाराचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्याने दरबारातील भाविक नाराज झाले. यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक बेशुद्द झाले. यावेळी अनेकांनी बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना समज देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला.