‘इसिस’च्या वाटेवर असलेल्या आयआयटी विद्यार्थ्याला घेतले ताब्यात

इसिसचा भारतातील म्होरक्या हारिस फारूकी ऊर्फ हरिश अजमल फारूखी आणि त्याचा साथीदार अनुराग सिंह ऊर्फ रेहान हे बांगलादेशातून भारतात आल्यानंतर त्यांना ढुबरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली. त्यानंतर या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
‘इसिस’च्या वाटेवर असलेल्या आयआयटी विद्यार्थ्याला घेतले ताब्यात
Published on

गुवाहाटी : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेबद्दल निष्ठा व्यक्त करून त्या संघटनेत सहभागी होण्याच्या मागार्वर असलेल्या आयआयटी-गुवाहाटीतील एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गुवाहाटीजवळच्या राजो परिसरातून त्याला शनिवारी रात्री ताब्यात घेण्यात आले आहे.

इसिसचा भारतातील म्होरक्या हारिस फारूकी ऊर्फ हरिश अजमल फारूखी आणि त्याचा साथीदार अनुराग सिंह ऊर्फ रेहान हे बांगलादेशातून भारतात आल्यानंतर त्यांना ढुबरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली. त्यानंतर या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आयआयटी-गुवाहाटीचा हा विद्यार्थी प्रवासात असताना वाटेतच त्याला ताब्यात घेण्यात आले, त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस महासंचालक जी. पी. सिंह यांनी शनिवारी ‘एक्स’वर म्हटले आहे.

या विद्यार्थ्यानेच ई-मेलद्वारे आपण इसिसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आयआयटी-गुवाहाटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला तेव्हा सदर विद्यार्थी दुपारपासूनच बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in