गुजरातमधील बावला-बगोदरा महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात ; १० ठार, ७ जण गंभीर जखमी

चोटिला मंदिराहून परत येत असताना टाटा एसी एससीव्ही पार्क केलेल्या ट्रकच्या मागून धडकल्याने हा अपघात झाला आहे.
गुजरातमधील बावला-बगोदरा महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात ; १० ठार, ७ जण गंभीर जखमी
Published on

गुजरातमध्ये एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दोन ट्रकची एकमेकांना धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. गुजरातच्या भावला-बगोदरा हायवेवर हा अपघात झाला आहे. यानंतर पोलिसांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली.

आज(११ ऑगस्ट) रोजी गुजरातच्या बावला-बगोदरा महामार्गावर टाटा एससीव्ही आणि ट्रकची धडक झाली. या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर सातहून अधिक जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.

चोटिला मंदिराहून परत येत असताना टाटा एसी एससीव्ही पार्क केलेल्या ट्रकच्या मागून धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, तीन मुले आणि दोन प्रौढ व्यक्तींचा समावेश आहे. तर सात जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in