न्यू यॉर्क : आकाशात वेळोवेळी घडणाऱ्या अनाकलनीय घटना मानवाच्या मनात नेहमीच कुतूहल निर्माण करीत आल्या आहेत. अशी एक आकर्षित करणारी घटना २९ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या काळात अख्ख्या जगाचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे. या काळात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत एक लघुग्रह प्रवेश करणार आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर चंद्रासमान भासणार आहे. त्यामुळे या काळात आकाशात नेहमीच्या चंद्रासोबतच 'मिनी मून'चा नजारा पृथ्वीवरून पाहायला मिळणार आहे.
आकाशगंगेत अनेक लघुग्रह संचार करीत असतात. काही वेळेस पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत ओढले जातात. अशा लघुग्रहांना 'मिनी मून' संबोधले जाते. सध्या पृथ्वीकडे येऊ घातलेला हा ग्रहाची लांबी ३३ फूट असून '२०२४ पीटी५' असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर हा ग्रह पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार आहे व ठरावीक अवधीनंतर तो पुन्हा अंतराळात लुप्त होईल, अशी माहिती येथील अमेरिकन अॅस्टॉनॉमिकल सोसायटीने म्हटले आहे. न्यू यॉर्क टाइम्स दैनिकाच्या वृत्तानुसार, सुदैवाने हा ग्रह २५ नाव्हेंबर नंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडणार आहे. आकाशगंगेत इतरही हजारो लघुग्रह आहेत. मात्र ते आपापाल्या मार्गाने मार्गक्रमण करत असता. जर यापैकी कुणी गृह पृथ्वीवर आदळला तरी त्यातून मोठा विध्वंस होऊ शकतो.