व्यापार तूट रुंदावल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार; भारताच्या मालनिर्यातीत झाली वाढ

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १७.१ टक्के वाढीसह १९२.५९ अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली आहे
 व्यापार तूट रुंदावल्याने अर्थव्यवस्थेवर  परिणाम होणार; भारताच्या मालनिर्यातीत झाली वाढ

ऑगस्टमध्ये निर्यातीत काही प्रमाणात घट आणि देशाच्या आयातीत झालेली वाढ लक्षात घेता देशाची व्यापार तूट रुंदावल्याने अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता चिंता वाढली आहे. चालू आर्थिक वर्षात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल सात टक्के घसरला आहे. तो यापुढेही दबावाखाली राहण्याची शक्यता आहे. त्यात वाढती महागाई आणि मॅक्रोइकॉनॉमिक आकडेवारीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे विश्लेषक आणि तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल-ऑगस्ट २०२१-२२मधील १६४.४४ अब्ज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १७.१ टक्के वाढीसह १९२.५९ अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली आहे. तर भारताची यंदा ऑगस्टमधील व्यापार मालाची निर्यात ३३.० अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी झाली असून ऑगस्ट २०२१ मधील ३३.३८ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या जवळपास समान पातळीवर होती.

ऑगस्ट२०२२मध्ये बिगर-पेट्रोलियम निर्यातीचे मूल्य २८.०९ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके होते. त्याने ऑगस्ट २०२१मधील २८.७३ अब्ज अमेरिकी डॉलर्स बिगर-पेट्रोलियम निर्यातीच्या तुलनेत केवळ २.२२ टक्क्यांची नकारात्मक वृद्धी नोंदवली. एप्रिल-ऑगस्ट २०२२-२३मधील बिगर-पेट्रोलियम निर्यातीचे मूल्य १५२.२९ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके होते, ज्याने एप्रिल-ऑगस्ट २०२१-२२ मधील १४१.०५ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत ७.९७ टक्के वृद्धी नोंदवली.

ऑगस्ट २०२२मधील बिगर-पेट्रोलियम आणि बिगर-रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीचे मूल्य २४.८ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके होते, ज्याने ऑगस्ट २०२१मधील २५,२९ अब्ज अमेरिकी डॉलरच्या बिगर-पेट्रोलियम आणि बिगर-रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीच्या तुलनेत १.९६ टक्के नकारात्मक वृद्धी नोंदवली. एप्रिल-ऑगस्ट २०२२-२३मध्ये बिगर-पेट्रोलियम आणि बिगर-रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीचे एकत्रित मूल्य १३५.४९ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके होते, जे एप्रिल-ऑगस्टमधील बिगर-पेट्रोलियम आणि बिगर-रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीच्या तुलनेत ८.४ टक्क्यांनी वाढले आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू (५०.६८ टक्के), तांदूळ (४२.३२ टक्के), सेंद्रिय आणि बिगर-सेंद्रिय रसायने (१३.३५ टक्के) या प्रमुख उत्पादनांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

ऑगस्ट २०२२मध्ये भारताची व्यापारी मालाची आयात ६१.६८ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती, तिने ऑगस्ट २०२१ मधील ४५.०९ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत ३६.७८ वाढ नोंदवली. एप्रिल-ऑगस्ट २०२२-२३मध्ये भारताची व्यापारी आयात ३१७.८१ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती, तिने एप्रिल-ऑगस्ट २०२१-२२मधील २१८.२२ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत ४५.६४ टक्के वाढ नोंदवली.

आयातीमधील वृद्धी, भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया आणि वेगाने होत असलेला विकास, यामुळे वाढत असलेली देशांतर्गत अर्थव्यवस्थेची मागणी दर्शवते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in