एएनआयने एक्सवर पोस्ट केलेले छायाचित्र
एएनआयने एक्सवर पोस्ट केलेले छायाचित्र

मतदार महिलेला बुरखा काढण्यास सांगितले; भाजप उमेदवार माधवी लता यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार के. माधवी लता यांच्याविरुद्ध निवडणूक अधिकाऱ्यांनी सोमवारी गुन्हा नोंदविला आहे.
Published on

हैदराबाद : हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार के. माधवी लता यांच्याविरुद्ध निवडणूक अधिकाऱ्यांनी सोमवारी गुन्हा नोंदविला आहे. छायाचित्र असलेले ओळखपत्र आणि चेहऱ्याशी सांगड घालण्यासाठी माधवी लता काही बुरखाधारी मुस्लीम मतदार महिलांना चेहऱ्यावरील बुरखा दूर करण्यास सांगत असल्याची व्हिडीओ फीत व्हायरल झाल्यानंतर लता यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मतदारांची ओळख पटावी यासाठी माधवी लता मतदान केंद्रावरील काही महिलांना चेहऱ्यावरील बुरखा दूर करण्यास सांगत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याबद्दल मलकपेठ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संपूर्ण तपासणी करूनच मतदारांना मतदान केंद्रात सोडण्याच्या सूचना माधवी लता पोलिसांना देत आहेत, असेही फितीत दिसत आहे. तेलंगणमधील लोकसभेच्या १७ जागांसाठी मतदान सुरू आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघात माधवी लता यांची एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्याशी लढत होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in