दिल्लीत फॅशन डिझायनर तरुणी मृतावस्थेत आढळली

तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवला आहे
 दिल्लीत फॅशन डिझायनर तरुणी मृतावस्थेत आढळली

नवी दिल्ली : व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेली एक २६ वर्षीय तरुणी गुरुवारी सकाळी दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्ह येथील घरात मृतावस्थेत आढळून आली. संबंधित तरुणीचे नाव दीपिका असल्याचे समजते.

पोलिसांनी घटनास्थळाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवला आहे. २६ वर्षीय फॅशन डिझायनर तरुणीने आत्महत्या केली की मृत्यूचे वेगळे काही कारण आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

logo
marathi.freepressjournal.in