
मुंबई : भारतीय रेल्वेने इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) संकेतस्थळ व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन तिकिट आरक्षणासाठी बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या १५ मिनिटांत आधार अधिप्रमाणिकरण अनिवार्य केले आहे. हा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होईल.
ऑनलाइन तिकिट प्रणालीचा गैरवापर टाळण्यासाठी आयआरसीटीसीने हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीच्या दिवशी आरक्षित तिकिटे बुक करण्यासाठी सामान्य आरक्षित तिकिटे उघडण्याच्या १० मिनिटांच्या मर्यादेच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. मात्र या दरम्यान भारतीय रेल्वेच्या अधिकृत तिकीट एजंटना सुरुवातीच्या दिवशीची आरक्षित तिकिटे बुक करण्याची परवानगी दिली जाणार नाही. संगणकीकृत पीआरएस काउंटरद्वारे सामान्य तिकिटांच्या बुकिंगमध्ये देखील कोणताही बदल होणार नाही.