आकाशची चाचणी यशस्वी

आकाश ही जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हवाई धोका ओळखून त्याला हे क्षेपणास्त्र उद‌्ध्वस्त करते
आकाशची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : डीआरडीओने शुक्रवारी नवीन पिढीच्या ‘आकाश’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओदिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून सकाळी १०.३० वाजता या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. कमी उंचीवरील मानवरहित हवाई लक्ष्य या क्षेपणास्त्राने पाडले. या चाचणीवेळी आकाश क्षेपणास्त्र यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे परीक्षण केले गेले. ज्यात क्षेपणास्त्र सिस्टीमच्या आरएफ सीकर, लॉन्चर, मल्टी फंक्शन रडार व कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन सिस्टीमचे परीक्षण केले गेले. एकात्मिक चाचणी केंद्रात लावलेल्या रडार्स, टेलिमेट्री व इलेक्ट्रो ऑप्टीकल ट्रॅकिंग सिस्टीममधून या चाचणीचा डेटा गोळा केला. डीआरडीओबरोबरच भारतीय हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते. आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय हवाई दल, बीडीएल आणि बीईएल या सरकारी कंपन्यांचे अभिनंदन केले.

क्षेपणास्त्राची वैशिष्टये

आकाश ही जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हवाई धोका ओळखून त्याला हे क्षेपणास्त्र उद‌्ध्वस्त करते. या नवीन पिढीच्या यंत्रणेत स्वयंचलित पद्धतीत एका वेळेत अनेक लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राच्या यंत्रणेला इलेक्ट्रॉनिक्स काऊंटर पद्धतीने विकसित केले आहे. भारतीय हवाई दलाबरोबरच ते भारतीय लष्करासाठी विकसित केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in