दिल्लीत आप 4, काँग्रेस 3 जागा लढणार : हरयाणा-गुजरात-चंडीगड-गोव्यातही युती; पण पंजाबमध्ये...

हरयाणात आपकडून एक उमेदवार दिला जाणार असून काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या आहेत. पण...
AAP-Congress Loksabha Election 2024
AAP-Congress Loksabha Election 2024

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राष्ट्रीय पक्षांनी जागावाटपाबाबत रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. अशातच आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचं जागावाटप निश्चित झालं असून आप राजधानी दिल्लीत चार जागा लढवणार आहे. तर काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा मिळाल्या आहेत. गुजरातमध्ये काँग्रेस २४ तर आप २ दोन जागांवर निवडणूक लढवणार आहे. हरयाणात आपकडून एक उमेदवार दिला जाणार असून काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस गोवामध्ये निवडणुकीच्या रिंगणात दोन जागांवर उमेदवार उभे करणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जागांसाठी काँग्रेस आणि आपमध्ये एकमत होण्याची चर्चा होती. आता या चर्चेला पूर्णविराम लागला असून जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, पूर्व दिल्ली आणि दक्षिण दिल्लीतही आम आदमी पक्षाचा उमेदवार असणार आहे. चांदणी चौक, उत्तर पूर्व आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून काँग्रेस उमेदवार देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

गुजरातमध्ये आपला भरुच आणि भावनगर या मतदारसंघासाठी जागा देण्यात आल्या आहेत. तर काँग्रेस २४ जागांवर उमेदवार उभं करणार असल्याची माहिती समोर आलीय. हरयाणातील कुरुक्षेत्रात आपचा एक उमेदवार असेल, तर काँग्रेससाठी ९ जागा सोडण्यात आल्या आहेत. तसंच चंडीगडमध्येही काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गोव्यात काँग्रेस दोन जागांवर लढणार असून आपच्या पारड्यात एकही जागा पडलेली नाही. तर लोकसभेसाठी पंजाबमधील सर्व जागांवर आप आणि काँग्रेस वेगवेगळे लढणार आहेत.

गुजरात (२६ जागा ) : काँग्रेस- २४, आप - २

हरयाणा (१० जागा ): काँग्रेस- ९, आप - १

दिल्ली (७ जागा) : काँग्रेस - ३, आप- ४

गोवा ( २ जागा ) : काँग्रेस - २, आप- लढणार नाही.

चंदीगड (एक जागा): काँग्रेस लढणार, आप लढणार नाही.

दिल्लीत कोणत्या मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार?

1) दक्षिण- पूर्व दिल्ली - काँग्रेस

२) चांदनी चौक - काँग्रेस

३) उत्तर- पश्चिम दिल्ली - काँग्रेस़

४) पूर्व दिल्ली - आप

५) नवी दिल्ली - आप

६) पश्चिम दिल्ली - आप

७) दक्षिण दिल्ली - आप

logo
marathi.freepressjournal.in