मतदारसंघाला दररोज भेट द्या, जनतेच्या समस्या जाणून घ्या; केजरीवालांचा आप आमदारांना कारागृहातून संदेश

कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त आपल्याला जनतेच्या समस्या सोडविणेही गरजेचे आहे, असे केजरीवाल यांनी संदेशात म्हटले असल्याचे सुनीता केजरीवाल यांनी सांगितले. केजरीवाल यांना मद्यधोरण घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मतदारसंघाला दररोज भेट द्या, जनतेच्या समस्या जाणून घ्या; केजरीवालांचा आप आमदारांना कारागृहातून संदेश
Published on

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या (आप) सर्व आमदारांनी दररोज आपापल्या मतदारसंघाला भेट द्यावी आणि जतनेला कोणत्या समस्या भेडसावत तर नाहीत ना याची खातरजमा करावी, असा संदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कारागृहातून पाठविला असल्याचे गुरुवारी सुनीता केजरीवाल यांनी सांगितले.

कारागृहात असलो तरी दिल्लीतील दोन कोटी जनता आपला परिवार आहे. त्यामुळे परिवाराला कोणतीही समस्या भेडसावता कामा नये, असेही केजरीवाल यांनी संदेशात म्हटले आहे.

कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त आपल्याला जनतेच्या समस्या सोडविणेही गरजेचे आहे, असे केजरीवाल यांनी संदेशात म्हटले असल्याचे सुनीता केजरीवाल यांनी सांगितले. केजरीवाल यांना मद्यधोरण घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in