सध्या देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या 'इंडिया' या आघाडीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. नुकतीच या आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. मात्र आता या आघाडीत घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. पंजाब सरकारमधील मंत्री अमनोल गगन मान यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन या संबंधीची घोषणा केली आहे.
यावेळी बोलताना अनमोल गगन मान म्हणाल्या की, पंजाबच्या १३ जागांवर आम आदमी पार्टी स्वतंत्र लढणार आहे. त्याठिकाणी आम्ही काँग्रेससोबत कुठलीही वाटाघाटी करणार नाहीत, असं मान यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या घोषणेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
त्या म्हणाले की, पंजाबचे लोक भगवंत नान यांच्यावर प्रेम करतात. लोकांनी इमानदार मानसाची निवड केली आहे. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी होणं शक्य नाही. आम्ही काँग्रेससोबत कोणतीही आघाडी करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. पंजाबमध्ये आम्ही भगवंत मान यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार आहोत. या निवडणुका आम आदमी पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जातील. आम आदमी पक्ष कुठल्याही वाटाघाटी करणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या पाटणा, बंगळूरु आणि मुंबई अशा तीन ठिकाणी बैठका झाल्या आहेत. यानंतर आता समन्व समितीच्या बैठका होणार आहेत. ही आघाडी भाजप सरकारशी एकजुटीने लढा देणार आहे. असं असताना पंजाबमध्ये मात्र आम आदमी पक्षाने वेगळी भूमिका घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे इतर राज्यात देखील असा तिढा निर्माण होण्याची शक्यता असल्याचं वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलं आहे.