Lok Sabha Elections 2024 : 'आप'कडून गुवाहाटीच्या उमेदवाराचे नाव मागे! आता ऐक्य दाखविण्याची वेळ काँग्रेसवर

गेल्या वर्षी गुवाहाटीमध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आप हा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळावणारा पक्ष होता.
Lok Sabha Elections 2024 : 'आप'कडून गुवाहाटीच्या उमेदवाराचे नाव मागे! आता ऐक्य दाखविण्याची वेळ काँग्रेसवर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणी केव्हाही होऊ शकते. नुकतेच काँग्रेसने लोकसभेच्या १२ उमेदवारीची घोषणा केली. यात काँग्रेसने गुवाहाटी, डिब्रूगढ आणि सोनितपूर या तीन जागांवर उमेदवार दिले आहे. परंतु, काँग्रेस आधीच आम आदमी पार्टीने त्या तीन जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि आपच्या तीन जागांवरून वाद होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु आपने आज (१५ मार्च) गुवाहाटी लोकसभा मदारसंघातील उमेदवार डॉ. भाबेन चौधरी यांची उमेदवारी मागे घेत काँग्रेस आणि आपच्या वादाच्या चर्चांवर पडदा टाकला. यामुळे आपने विरोधकांच्या ऐक्याचे उत्तम उदाहरण दिले आहे. त्यानंतर काँग्रेसने सोनितपूर आणि डिब्रूगढ या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे मागे घेत विरोधकांचे ऐक्य दाखवावे, असे आवाहन देखील 'आप'ने पत्राद्वारे केले आहे.

'आप'ने पत्रात म्हटले, २०२४ ची लोकसभा निवडणुका ऐतिहासिक होणार आहेत. या निवडणुकीत भाजपला भारतातील लोकशाही संपवायची आहे आणि आपल्याला भारतीय लोकशाही वाचवण्याची आहे. यासाठी आप हा इंडिया आघाडीमध्ये सामील झाला आहे. इंडियात आल्यानंतर आपल्या वाट्याला कमी-जास्त जागा येतील याचा विचार कधीच केला नाही. उलट भाजपच्या उमेदवारांचा पराभव करणे हेच आमचे एकमेव उद्दिष्ट आहे.

गेल्या वर्षी गुवाहाटीमध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आप हा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळावणारा पक्ष होता. परंतु, निवडणुकीत मतांचे विभाजन झाले तर, त्याचा फायदा हा भाजपला होईल. त्यामुळे निवडणुकीतील मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि विरोधकांमध्ये फूट पडू नये म्हणून 'आप'ने गुवाहाटी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता काँग्रेसने डिब्रूगढ आणि सोनितपुर या दोन लोकसभा मदरासंघातील उमेदवारांची नावे मागे घेऊन विरोधकांचे ऐक्य दाखवावे, असे आवाहन आपने पत्रातून काँग्रेसला केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in