आप नेते सत्येंद्र जैन यांच्या जामिनाला मुदतवाढ

आप नेते सत्येंद्र जैन यांच्या जामिनाला मुदतवाढ

जामीन १२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे

नवी दिल्ली : आपचे माजी मंत्री आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सत्येंद्र जैन यांच्या जामिनास येत्या १२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा यांनी या प्रकरणाची सुनावणी नाकारल्यामुळे प्रकरण न्या. ए. एस. बोपन्ना यांच्यापुढे मांडण्यात आला. त्यांनी या प्रकरणाची सुनावणी १२ सप्टेंबर रोजी नियोजित केली.

जैन यांच्या वजनात ३५ किलोंची घट झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय कारणासाठी सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. ३० मे २०२२ रोजी त्यांना ईडीने मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. त्यानंतर त्यांना औषधोपचार करण्यासाठी ६ मे २०२३ रोजी सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. २१ जुलै रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता त्यांचा जामीन १२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in