गुजरातमधील आप आमदार पोलिसांपुढे शरण ;वन कर्मचाऱ्याला धमकी व गोळीबार प्रकरण भोवले

त्यांच्यासह अन्य तीन आरोपींनीही आत्मसमर्पण केल्याचे पोलीस उपअधीक्षक घनश्याम सरवैया यांनी सांगितले.
गुजरातमधील आप आमदार पोलिसांपुढे शरण
;वन कर्मचाऱ्याला धमकी व गोळीबार प्रकरण भोवले
PM

देडियापाडा : गुजरातमधील आम आदमी पक्षाचे आमदार चैतार वसावा यांनी नर्मदा जिल्ह्यातील देडियापाडा शहरात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. हल्ला व गोळीबारप्रकरणी असलेल्या गुन्ह्यानंतर पोलीस त्यांच्या शोधात होते.

ते आणि अन्य काही व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविलेला असून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आणि हवेत एक राऊंड गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

वसावा यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह येथील पक्ष कार्यालयातून सकाळी मिरवणुकीचे नेतृत्व करून देडियापाडा पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या मिरवणुकीचे काही व्हिडीओही त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या आत्मसमर्पणानंतर त्यांना पोलिसांनी औपचारिकपणे अटक केली. त्यांच्यासह अन्य तीन आरोपींनीही आत्मसमर्पण केल्याचे पोलीस उपअधीक्षक घनश्याम सरवैया यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in