दिल्ली अध्यादेश विरोधप्रकरणी काँग्रेसचा आप पक्षाला पाठिंबा आपकडून स्वागत

आम आदमी पक्षाचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते राधव चढ्ढा यांनी काँग्रेसच्या निर्णयाचे स्वागत केले
दिल्ली अध्यादेश विरोधप्रकरणी काँग्रेसचा आप पक्षाला पाठिंबा आपकडून स्वागत
Published on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिल्लीतील प्रशासकीय अधिकार स्वत:कडे ठेवण्यासाठी काढलेल्या आदेशाला आपला विरोध असल्याची घोषणा रविवारी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. केंद्र सरकारचा हा अध्यादेश म्हणजे संघराष्ट्र पद्धतीस करण्यात आलेला घातपात आहे, असे काँग्रेसने अध्यादेशाला आपला पाठिंबा व्यक्त करताना म्हटले आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या या निर्णयाचे स्वागत करताना एक सकारात्मक घटना, अशी टिप्पणी केली आहे.

काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, पक्षाचे धोरण स्पष्ट आहे. काँग्रेस पक्ष केंद्र सरकारची विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्य सरकारांच्या अधिकारांमध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ सहन करणार नाही. यामुळे पक्षाने दिल्ली अध्यादेशाला जेव्हा केव्हा तो संसदेत मंजुरीसाठी सादर करण्यात येर्इल तेव्हा त्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रसंघ पद्धतीला सुरुंग लावण्याच्या प्रयत्नांना आम्ही सातत्याने विरोध करीत आहोत. तसेच राज्यपालांच्या माध्यमातून विरोधी पक्ष सत्तेत असलेली राज्ये चालवण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांनाही आम्ही सातत्याने विरोध करीत आहोत. आमची भूमिका अगदी स्पष्ट असून, आम्ही दिल्ली अध्यादेशाला पाठिंबा देणार नाही. आम आदमी पक्षाचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते राधव चढ्ढा यांनी काँग्रेसच्या निर्णयाचे स्वागत केले असून, ही एक सकारात्मक घटना असल्याची टिप्पणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in