
नवी दिल्ली : दिल्ली अध्यादेश प्रकरणात संसदेत विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने जाहीर केल्यानंतर आप पक्षाने सोमवारपासून बंगळुरू येथे सुरू होत असलेल्या भाजप विरोधी आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार असल्याची घोषणा आप पक्षातर्फे करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या राजकीय बैठकीनंतर आम आदमी पक्षाचे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी ही घोषणा केली आहे.