दिल्ली, पंजाबनंतर आप आता कर्नाटक निवडणुकाही लढवणार; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

दिल्ली आणि पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळाल्यानंतर आम आदमी पक्ष आता कर्नाटक विधानसभा निवडणुकाही लढवणार आहेत
दिल्ली, पंजाबनंतर आप आता कर्नाटक निवडणुकाही लढवणार; अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली. १० मेला कर्नाटकमध्ये मतदान होणार असून १३ मेला मतमोजणी होणार आहे. अशामध्ये आता दिल्ली आणि पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळाल्यानंतर आम आदमी पक्ष आता कर्नाटकमध्येही निवडणूक लढवणार आहेत.

आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. तसेच, यावेळी त्यांनी राज्यात सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले आहे.

आप पक्ष आधीपासूनच कर्नाटकमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कर्नाटकमध्ये रॅलीदेखील काढली होती. त्यामुळे आपची सरळ टक्कर ही भाजप आणि काँग्रेसशी होणार आहे. विशेष म्हणजे, आप पक्ष सर्व जागांवर लढणार असून आता काँग्रेस, भाजप आणि जेडीएस यांच्यामध्ये असलेल्या लढतीत आता आपचादेखील प्रवेश झाला आहे. आपने ८० जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in