अबकी बार भाजप ४५० पार;त्रिपुरा मुख्यमंत्र्यांचा दावा

२०१९ निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या तर कॉंग्रेसला ५२ जागांवर समाधान मानावे लागले होते.
अबकी बार भाजप ४५० पार;त्रिपुरा मुख्यमंत्र्यांचा दावा

आगरतळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप देशभरात ४५० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा दावा केला आहे. पत्रकारांशी संवाद साधतांना रविवारी ते म्हणाले की भाजप यावेळी ४०४ जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र माझ्या अंदाजानुसार यावेळी भाजप ४५०चा आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. २०१९ निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या तर कॉंग्रेसला ५२ जागांवर समाधान मानावे लागले होते. राज्यात दोन लोकसभा जागा असून त्या मोठ्या फरकाने भाजप जिंकेल. त्यासाठीची तयारी सुरु करण्यात आली आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच राममंदिर प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून मंदिरांची स्वच्छता करावी असे आवाहन देखील त्यांनी राज्यातील जनतेला केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in