SIR Protest : विरोधकांना संपवण्यासाठीच एसआयआर - अभिजीत दिपके

एसआयआर अंतर्गत मतदार यादीतून नावे वगळण्याची मोहीम ही भाजपच्या विरोधात असणाऱ्यांचा मताधिकार हिरावून घेण्यासाठीच राबवली जात आहे, असा गंभीर आरोप कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे.
SIR Protest : विरोधकांना संपवण्यासाठीच एसआयआर - अभिजीत दिपके
SIR Protest : विरोधकांना संपवण्यासाठीच एसआयआर - अभिजीत दिपके(Photo-X)
Published on: 

बेंगळुरू : एसआयआर अंतर्गत मतदार यादीतून नावे वगळण्याची मोहीम ही भाजपच्या विरोधात असणाऱ्यांचा मताधिकार हिरावून घेण्यासाठीच राबवली जात आहे, असा गंभीर आरोप कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर देशातील लोकशाही धोक्यात आणल्याचा आरोप त्यांनी केला.

बेंगळुरू येथे विविध नागरी समाज संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘पीपल्स ट्रिब्युनल’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी, ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत असे नागरिक प्रत्यक्ष हजर होते, जे आपण अजून जिवंत असल्याचे दाखवून देत होते.

SIR Protest : विरोधकांना संपवण्यासाठीच एसआयआर - अभिजीत दिपके
SIR Protest : ध्रुव राठी CJP च्या आंदोलनासाठी भारतात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, 'लढा सुरूच राहणार', दिपकेंचा निर्धार

‘हा’ लोकशाहीचा मृत्यू

ज्या लोकांना मृत घोषित केले गेले, ते आज इथे जिवंत उभे आहेत. त्यामुळे मृत्यू या लोकांचा झालेला नाही, तर या देशाच्या लोकशाहीचा मृत्यू झाला आहे, असे दीपके म्हणाले.मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून मुख्य निवडणूक आयुक्तांसह निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांची नावे मतदार यादीतून कमी केल्याचा आरोप त्यांनी केला.

ज्ञानेशकुमारांनी राजीनामा द्यावा - ध्रुव राठी

आयोगाकडून "शून्य पारदर्शकता आणि शून्य उत्तरदायित्व" असल्याचा आरोप करीत प्रसिद्ध यूट्युबर ध्रुव राठी यांनी ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आपण कोणत्याही सत्ता बदलासाठी किंवा राजकीय पक्षाच्या वतीने आलेलो नसून, एक सामान्य नागरिक म्हणून या आंदोलनात सहभागी झालो आहोत, आपल्याला एलोन मस्क किंवा जॉर्ज सोरोस यांनी कोणताही निधी दिलेला नाही, असेही ते म्हणाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in