लखनौ-गोरखपूर महामार्गावर अपघात ; सात जणांचा मृत्यू, 40 जण गंभीर

हा अपघात इतका भीषण होता की बसमधील काही प्रवासी बाहेर फेकले गेले, तर काही ट्रकखाली चिरडले गेले
लखनौ-गोरखपूर महामार्गावर अपघात ; सात जणांचा मृत्यू, 40 जण गंभीर

उत्तर प्रदेशातील अयोध्येतील लखनौ-गोरखपूर महामार्गावर एका खासगी बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 40 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. दरम्यान, घटनेनंतर जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी रात्री अयोध्येहून येणाऱ्या एका खासगी बसने आंबेडकरनगरला जाण्यासाठी लखनौ-गोरखपूर महामार्गावर वळसा मारण्याचा प्रयत्न केला, असे एएनआयने वृत्त दिले आहे. मात्र, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की बसमधील काही प्रवासी बाहेर फेकले गेले, तर काही ट्रकखाली चिरडले गेले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या सहाय्याने ट्रकखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या दुर्दैवी घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर लखनौ-गोरखपूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in