Video: अपघातानंतर 'तो' मदत मागत राहिला अन् लाेकं लुबाडत राहिले, आग्रा येथील लाजिरवाणा व्हिडीओ व्हायरल

वेळेवर मदत न मिळाल्याने व्यावसायिक शेवटी मरण पावला. नागरिकांनी परिस्थितीचा फायदा घेत त्याला लुटले या अपघातात एक लाख रुपयांचा ऐवज लुटला गेला.
 Video: अपघातानंतर 'तो' मदत मागत राहिला अन्   लाेकं लुबाडत राहिले, आग्रा येथील लाजिरवाणा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे 9 जानेवारी रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका कंटेनर चालकाने दारूच्या नशेत महामार्गावर पाच कारहून अधिक वाहनांना चिरडले होते. या अपघातात एका व्यावसायिकासह तिघांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. अपघातानंतर तीन मृतदेह रस्त्यावर विखुरले होते आणि जखमी लोक वेदनेने आक्रोश करत होते. दरम्यान, नागरिकांनी परिस्थितीचा फायदा घेत अपघातात जखमी व्यावसायिकाला मदत करण्याऐवजी लुटले, या अपघातात एक लाख रुपयांचा ऐवज लुटला गेला. या व्यावसायिकाचे नाव धर्मेंद्र असल्याचं कळतंय.

धर्मेंद्र यांच्याकडे एक बॅग होती, त्यात एक लाख रुपये आणि काही कागदपत्रे असल्याची माहिती आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. याच गर्दीतून तरुणाने व्यावसायिकाचे एक लाख रुपये चोरले. याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून आरोपींची ओळख पटविण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in