
पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झालेल्या सरबजीतसिंग यांच्या पत्नी सुखप्रीतकौर यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रविवारी सुखप्रीतकौर त्यांची मुलगी स्वप्नदीप हिला भेटण्यासाठी एका व्यक्तीसोबत दुचाकीवरून निघाल्या होत्या. जालंधरला जाण्यासाठी त्या अमृतसर मार्गे निघाल्या होत्या; मात्र अमृतसरला पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या दुचाकीला अपघात झाला व त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि सोमवारी सकाळी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. सुखप्रीतकौर अमृतसरच्या खजाना चौकात दुचाकीवरून कोसळल्या. यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती.