काश्मीरच्या अनंतनागमध्ये चौथ्या दिवशीही कारवाई सुरुचं ; आणखी एका जवानाला वीरमरण

दहशतवाद्यांशी लढतांना बुधवारी दोन लष्कराचे अधिकारी यात एक कर्नल आणि एक मेजर होते. तसेच जम्मू- काश्मीर पोलिस दलातील एक वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील शहीद झाले आहेत.
काश्मीरच्या अनंतनागमध्ये चौथ्या दिवशीही कारवाई सुरुचं ; आणखी एका जवानाला वीरमरण

जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्यातील गेल्या तीन तीन दिवसांपासून दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक सुरु आहे. आज पहाटे पासून दहशतवाद्यांशी शोधमोहीम सुरु करण्यात आली. यावेळी झालेल्या चकमकीत आणखी एका भारतीय जवानाला वीरमरण आलं आहे. मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या या चकमकीत आतापर्यंत तीन अधिकारी आणि एक जवान अशा चार जणांना वीरमरण आलं आहे. गेल्या ४८ तासांपासून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारतीय लष्कराकडून शोधमोहीम सुरू आहे. दहशतवाद्यांशी लढतांना बुधवारी दोन लष्कराचे अधिकारी यात एक कर्नल आणि एक मेजर होते. तसेच जम्मू- काश्मीर पोलिस दलातील एक वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील शहीद झाले आहेत.

सुरक्षा दलाच्या जवानांनी अनंतनागतील कोकरनाग जंगल परिसराला संपूर्ण वेढा घातला असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ताबडतोब शोध मोहीम सुरु केली गेली आहे. बुधवारी हे ऑपरेशन सुरु केलं होते. ४८ तास झाले ऑपरेशन सुरु असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि डीएसपी हुमायून भट, असं शहीद झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. तर आज शहीद झालेल्या चौथ्या जवानाची अद्याप ओळख समोर आलेली नाही.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी 'द रेझिस्टन्स फ्रंट' या लष्करे तोयबाशी संलग्नीत संघटनेचे असल्याचं समजते. या परिसरात दोन-तीन दहशतवादी लपून बसले आहेत असा सुरक्षा दलांना संशय आहे. हेरॉन ड्रोन आणि क्वाडकॉप्टर या परिसरात पाळत ठेवून असून त्यांना शोध मोहिमेत मदत करण्यासाठी तैनात करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in