अभिनेत्री जयाप्रदा यांना ६ महिन्यांची शिक्षा

अभिनेत्री जयाप्रदा आणि त्यांच्यासह इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे
अभिनेत्री जयाप्रदा यांना ६ महिन्यांची शिक्षा

चेन्नई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने ६ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

चेन्नईत जयाप्रदा यांचे स्वत:च्या मालकीचे थिएटर आहे. त्यांच्या थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिकेप्रकरणी जयाप्रदा यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जयाप्रदा यांना ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या चित्रपटगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ईएसआयची रक्कम भरलेली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

अभिनेत्री जयाप्रदा यांनी चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांना पूर्ण रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच खटला फेटाळण्यासाठी न्यायालयात दाद मागण्यात आली होती. मात्र, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता मात्र अभिनेत्री जयाप्रदा आणि त्यांच्यासह इतर तिघांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in