अभिनेत्री राधिका सरथ कुमार यांना तामिळनाडूत भाजपची उमेदवारी

पीएमकेने पक्षाचे प्रमुख अंबुमणी रामदास यांच्या पत्नी सौम्या अंबुमणी यांना धर्मपुरी मतदारसंघासाठी नवीन उमेदवार म्हणून घोषित केले आहे. सौमिया अंबुमणी या निसर्ग संवर्धनात गुंतलेल्या पसुमाई थायागम या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा आहेत.
अभिनेत्री राधिका सरथ कुमार यांना तामिळनाडूत भाजपची उमेदवारी

चेन्नई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तामिळनाडूत अभिनेत्री-राजकारणी राधिका सरथ कुमार यांना विरुधुनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर पुद्दुचेरीचे गृहमंत्री ए नमशिवयम यांना पुद्दुचेरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अभिनेता आर. सरथ कुमार यांनी नुकताच त्यांचा पक्ष अखिल भारतीय समथुवा मक्कल काची विलीन केले आणि पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पीएमकेने पक्षाचे प्रमुख अंबुमणी रामदास यांच्या पत्नी सौम्या अंबुमणी यांना धर्मपुरी मतदारसंघासाठी नवीन उमेदवार म्हणून घोषित केले आहे. सौमिया अंबुमणी या निसर्ग संवर्धनात गुंतलेल्या पसुमाई थायागम या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने तामिळनाडूतील १४ जागांसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या चौथ्या यादीनुसार आणि पुद्दुचेरीमधील एकमेव जागेसाठी, तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेले वकील आर. सी. पॉल कनागराज चेन्नई उत्तर लोकसभेतून निवडणूक लढवणार आहेत. आणखी एक वकील ए अश्वथामन यांना तिरुवन्नमलाईसाठी उमेदवारी दिली आहे. राज्य सरचिटणीस पोन व्ही. बालगणपती यांना तिरुवल्लूर राखीव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

उर्वरित उमेदवारांमध्ये के .पी. रामलिंगम (नमक्कल), ए. पी. मुरुगानंदम (तिरुपूर), के. वसंतराजन (पोल्लाची), व्ही. व्ही. सेंथिलनाथन (करूर), पी. कार्तियायिनी (चिदंबरम राखीव मतदारसंघ), एस. जी. एम. रमेश (नागापट्टीनम राखीव मतदारसंघ), एम. मुरुगानंदम (तंजावर), देवनाथन यादव (शिवगंगा), राज्य उपाध्यक्ष रामा श्रीनिवासन (मदुराई) आणि बी. जॉन पांडियन (टेनकासी राखीव मतदारसंघ) यांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in