IANS वृत्तसंस्थेवर अदानी समूहाचा ताबा

IANS वृत्तसंस्थेवर अदानी समूहाचा ताबा

उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने वृत्तसंस्था 'आयएएनएस' मधील उर्वरित २४ टक्के हिस्सा खरेदी करून या वृत्तसंस्थेवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. या व्यवहाराची आर्थिक रक्कम मात्र जाहीर करण्यात आलेली नाही.
Published on

नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने वृत्तसंस्था 'आयएएनएस' मधील उर्वरित २४ टक्के हिस्सा खरेदी करून या वृत्तसंस्थेवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. या व्यवहाराची आर्थिक रक्कम मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. 'एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड'ने 'आयएएनएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड'मधील उर्वरित हिस्सा खरेदी करण्यासाठी शेअर खरेदी करार केला असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात दिली आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये अदानी समूहाने 'आयएएनएस' मधील (इंडो-एशियन न्यूज सर्व्हिस) ५०.५० टक्के बहुसंख्य हिस्सा विकत घेतला होता. त्यामुळे 'आयएएनएस' ही अदानी समूहाच्या मीडिया शाखेची उपकंपनी बनली होती. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये 'एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड' ने 'आयएएनएस' मधील मतदानाधिकार असलेल्या शेअर्समधील आपला हिस्सा वाढवून ७६ टक्के केला, तसेच जवळपास सर्वच मतदानाधिकार नसलेले शेअर्स आपल्या ताब्यात घेतले होते.

logo
marathi.freepressjournal.in