अदानी लॉजिस्टिकने केला आणखी एका कंपनीशी महत्त्वाचा करार; ८३५ कोटींच्या व्यवहाराला मंजुरी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीडी टंब हा सर्वात मोठा इन-लँड कंटेनर डेपो आहे.
अदानी लॉजिस्टिकने केला आणखी एका कंपनीशी महत्त्वाचा करार; ८३५ कोटींच्या व्यवहाराला मंजुरी
Published on

जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी एकामागून एक नवनवीन उद्योग क्षेत्रात पदार्पण करत असून अनेक कंपन्या ताब्याता घेत आहेत. एका वृत्तानुसार, अदानीची समुहाची कंपनी अदानी लॉजिस्टिकने ८३५ कोटी रुपयांचा एक महत्त्वाचा करार केला आहे. इनलँड कंटेनर डेपो (आयसीडी) टंब ताब्यात घेण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडची उपकंपनी असलेल्या अदानी लॉजिस्टिक्सने ८३५ कोटी रुपयांमध्ये आयसीडी टंबच्या अधिग्रहणासाठी नवकार कॉर्पोरेशनशी करार केला असल्याचे सांगितले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीडी टंब हा सर्वात मोठा इन-लँड कंटेनर डेपो आहे. त्याची क्षमता ०.५ दशलक्ष किंवा पाच दशलक्ष टीईयू आहे. आयसीडी हे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे हजीरा बंदर आणि न्हावा शेवा बंदर यांच्यामध्ये स्थित आहे. अदानी लॉजिस्टिक्सने म्हटले आहे की, हा करार भविष्यात कंपनीची क्षमता आणि कार्गो वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. कंपनीने असेही कळवले आहे की या करारामध्ये आयसीडी टंबच्या जवळ वेस्टर्न डीएफसीशी जोडलेल्या चार रेल्वे हँडलिंग लाईन्स आणि एक खाजगी मालवाहतूक टर्मिनल समाविष्ट आहे.

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड)चे सीईओ करण अदानी म्हणाले की, देशातील सर्वात मोठ्या आयसीडीपैकी एक असलेल्या टंबचे अधिग्रहण कंपनीच्या भविष्यातील योजनांना बळ देईल. "हे संपादन आमच्या ट्रान्सपोर्ट युटिलिटी बनण्याच्या धोरणाला पूरक ठरेल.’’

logo
marathi.freepressjournal.in