अदानी पोर्टच्या लेखापरीक्षणाचे काम डेलॉईट सोडण्याच्या तयारीत

लेखा परीक्षकांच्या राजीनाम्याची घोषणा काही दिवसांत होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले
अदानी पोर्टच्या लेखापरीक्षणाचे काम डेलॉईट सोडण्याच्या तयारीत
Published on

नवी दिल्ली : अदानी समूहाला पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. अदानी पोर्ट ॲँड एसईझेडचे लेखापरीक्षण करणारी कंपनी डेलॉईट हॅसकिन्स ॲॅण्ड सेल्स एलएलपी हे काम सोडण्याच्या तयारीत आहे.

काही व्यवहारांबाबत कंपनीच्या व्यवस्थापनाशी लेखा परीक्षक डेलॉईट हॅसकिन्स ॲॅण्ड सेल्स एलएलपीचे मतभेद झाले आहेत. लेखा परीक्षकांच्या राजीनाम्याची घोषणा काही दिवसांत होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

डेलॉईट हॅसकिन्स ॲॅण्ड सेल्स एलएलपी वित्तीय वर्ष २०१८ चे अदानी पोर्ट ॲँड एसईझेडचे लेखापरीक्षण करत आहे. यापूर्वी हे काम एसआरबीसी ॲँड कंपनी एलएलपी करत होती. डेलॉईटने कंपनीच्या खात्यांवरील तीन व्यवहारांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यात कंत्राटदाराकडून वसूल करण्याच्या रकमेचा समावेश आहे. याची नोंद हिंडेनबर्ग अहवालातही केली आहे.

डेलॉईट हॅसकिन्स ॲॅण्ड सेल्स एलएलपीने २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत व पूर्ण वर्षाच्या लेखापरीक्षणात तीन कंपन्यांसोबत झालेल्या व्यवहारांना अधोरेखित केले आहे. अदानी पोर्ट ॲँड एसईझेडने सांगितले की, या कंपन्यांसोबत आपल्या समूहाच्या कंपन्यांशी काहीही संबंध नाही, तर स्वतंत्र पडताळणी न केल्यामुळे कंपनीच्या वक्तव्याची पडताळणी करू शकत नाही, असेही लेखापरीक्षक डेलॉईट हॅसकिन्स ॲॅण्ड सेल्स एलएलपीने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in