Adani Group : 'हा भारतावर ठरवून केलेला हल्ला'; हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर अदानी समूहाकडून ४१३ पानांचे स्पष्टीकरण

न्यूयॉर्क स्थित अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडेनबर्गच्या एका अहवालामुळे अदानी समूहाला (Adani Group) मागच्या आठवड्यात मोठे नुकसान सहन करावे लागले होते.
Adani Group : 'हा भारतावर ठरवून केलेला हल्ला'; हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर अदानी समूहाकडून ४१३ पानांचे स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क स्थित 'हिंडनबर्ग रिसर्च' (Hindenburg) नावाच्या एका गुंतवणूक विश्लेषण संस्थेने एका अहवालातून अदानी समूहावर (Adani Group) गंभीर आरोप केले होते. यामध्ये ते म्हणाले होते की, अदानी समूहाने शेअर बाजारात घोटाळा केला आहे. त्यांच्या या अहवालानंतर अदानी समूहाला मोठे नुकसान सहन करावे लागले. यावर आता अदानी समूहाने स्पष्टीकरण देणारे ४१३ पानांचे उत्तर दिले आहे. तसेच, "हा अहवाल म्हणजे भारतावर केलेला पूर्वनियीजीत हल्ला आहे." अशी टीकादेखील करण्यात आली आहे.

‘हिंडेनबर्ग’च्या या अहवालानंतर अदानी समूहाला तब्बल ४.२ लाख कोटींचा फटका बसला. या अहवालाला उत्तर देताना त्यामध्ये म्हंटले आहे की, "हिंडेनबर्गच्या या अहवालाचा मूळ उद्देश हा फक्त अमेरिकन कंपनीला फायदा मिळवून देणे, हाच होता. हा अहवाल म्हणजे केवळ एका विशिष्ट कंपनीवर केलेला अवास्तव हल्लाच नाही, तर भारताचे स्वातंत्र्य, अखंडता, गुणवत्ता, विकास आणि महत्त्वाकांक्षेसह भारतीय संस्थांवर पूर्वनियोजित केलेला हल्ला आहे. विश्वासार्हता, नैतिकता नसलेल्या संस्थेच्या अहवालामुळे आमच्या गुंतवणूकदारांवर परिणाम झाला. ‘हिंडेनबर्ग’चा अहवाल ‘स्वतंत्र’ संशोधन केलेला नसून चुकीच्या माहितीच्या आधारे बिनबुडाचे आरोप लावून बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे"

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in