तामिळनाडूमध्ये अदानींची ४२ हजार कोटींची गुंतवणूक

अदानी ग्रीन एनर्जी पुढील पाच ते सात वर्षांत तीन पंप स्टोरेज प्रकल्पांमध्ये २४,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
तामिळनाडूमध्ये अदानींची ४२ हजार कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी उद्योग समूहाने तामिळनाडूमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. तामिळनाडू ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीटमध्ये याची घोषणा करण्यात आली. याअंतर्गत अदानी ग्रुप राज्यात ४२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अदानी पोर्ट्सचे एमडी करण अदानी यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.

अदानी ग्रीन एनर्जी पुढील पाच ते सात वर्षांत तीन पंप स्टोरेज प्रकल्पांमध्ये २४,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय, अदानी कोनेक्स पुढील सात वर्षांत हायपरस्केल डेटा सेंटरमध्ये १३,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. ४२,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक योजनेंतर्गत, अदानी टोटल गॅस ८ वर्षांत १,५६८ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, तर अंबुजा सिमेंट पुढील पाच वर्षांत तीन सिमेंट ग्राइंडिंग प्लांटमध्ये ३,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.

अदानी समूह आधीपासूनच तामिळनाडूमध्ये पोर्ट अँड लॉजिस्टिक, खाद्यतेल, वीज निर्मिती, गॅस वितरण, डेटा सेंटर, ग्रीन एनर्जी, सिमेंट उत्पादन आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसाय करत आहे. अदानी पोर्ट्स कंपनी कट्टुपल्ली आणि एन्नोर बंदर चालवत आहेत, तर तिरुवल्लूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३,७३३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. याशिवाय कुड्डालोर आणि तिरुपूर जिल्ह्यांतील सिटी गॅसचे वितरण अदानी टोटल गॅसद्वारे केले जाते.

logo
marathi.freepressjournal.in