तेजस एक्स्प्रेसला अतिरिक्त विस्टाडोम डबा

प्रवाशांनी ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी आपल्या तिकिटाची स्थिती जाणून घ्या
तेजस एक्स्प्रेसला अतिरिक्त विस्टाडोम डबा

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने करमाळी तेजस एक्स्प्रेसला अतिरिक्त विस्टाडोम डबा लावण्याचा निर्णय घेतला आहे. १४ एप्रिलपासून हा डबा लावला जाणार आहे.

या एक्स्प्रेसमध्ये दोन विस्टाडोम कोच, ११ चेअर कार, एक एक्झिक्युटिव्ह चेअर, दोन सामान व जनरेटर अधिक व्हॅन्स अशी रचना असेल.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या ट्रेनला प्रवाशांची प्रतीक्षा यादी आहे. प्रवाशांनी ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी आपल्या तिकिटाची स्थिती जाणून घ्यावी. तसेच कोविडबाबतच्या सर्व सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in