'आदित्य एल-1' सुर्याला गवसणी घालण्यासाठी सज्ज ; भारतापूर्वी या देशांनी राबवल्या होत्या मोहिमा

सूर्याचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी इस्रोचं हे पहिलंच मिशन असणार आहे.
'आदित्य एल-1' सुर्याला गवसणी घालण्यासाठी सज्ज ; भारतापूर्वी या देशांनी राबवल्या होत्या मोहिमा

भारताची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम 'आदित्य एल-1' लवकरच लॉंच होणार आहे. शनिवारी (2 सप्टेंबर) रोजी पहाटे 11:50 वाजता 'आदित्य एल-1'चं प्रक्षेपण केलं जाणार आहे. सूर्याचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी इस्रोचं हे पहिलंच मिशन असणार आहे. यासाठी 'आदित्य एल १' उपग्रहाला अंतराळात नेणारं PSLV रॉकेट लाँच पॅडवर मिशन पार पडायला सज्ज झालं आहे. तसंच, या मोहिमेची रंगीत तालीमही यशस्वीपणे पार पडली आहे.

सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असणाऱ्या एका लँग्रेज पॉइंटवर 'आदित्य एल-1' हा उपग्रह ठेवण्यात येणार आहे. त्या जागेवरून सूर्याचा अधिक स्पष्टपणे आणि विनाअडथळा अभ्यास करणं अधिक शक्य होईल. हा पॉइंट पृथ्वीपासून जवळजवळ 15 लाख किलोमीटर दूर आहे.

भारताआधी अमेरिका, जर्मनी आणि युरोपने सौर मोहिमा राबवल्या आहेत. या सर्व देशांनी एकत्र मिळून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आतापर्यंत जवळजवळ 22 मिशन लाँच केले आहेत. यातील सर्वातजास्त मोहिमा नासाने राबवल्या आहेत. तसंच पहिली सौर मोहीम देखील नासानेच राबवली होती. 'चांद्रयान-३' नंतर सगळयांच लक्ष हे सौर मोहीम 'आदित्य एल-1'कडे लागून आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in